स्वाभिमानी विचार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत मुखपत्र ..

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

​​​​​​​१०% साखर साठा निर्यातीस सक्ती करा : खा राजु शेट्टी

Published 9 months ago by Admin

१०% साखर साठा निर्यातीस सक्ती करा : खा राजु शेट्टी

नवी दिल्ली : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाल्याने साखरेचे दर कोसळले कारण दाखवत साखर कारखांनदार ऊस उत्पादक शेतकर्यांना ऊस देय रक्कम देण्यास राजी नसल्याने देशात एकवीस हजार कोटी रुपयांची रक्कम थकित झाली असुन याचा मोठा फटका ऊस उत्पदक शेतकर्यांना बसत आहे त्यामुळे देशातील प्रत्येक साखर कारखान्यास किमान दहा टक्के साखर निर्यात करण्यास सक्ती करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा श्री राजु शेट्टी यांनी केली. नवी दिल्ली येथे त्यांनी या प्रश्नी वाणिज्य मंत्री श्री सुरेश प्रभु यांची भेट घेत साखर निर्यातीस प्राधान्य देण्यात यावे याची मागणी केली. साखर निर्यातीस जागतिक बाजारात दर जरी कमी असला तरी साखर निर्यातीने होणार असलेल्या नुकसान पेक्षा  प्राधान्यांने साखर निर्यात केल्यास साखरेचे दरात वाढ होणार असलेला फायदा मोठा आहे. या वेळी श्री राजु शेट्टी यांनी सांगितले की साखर निर्यात झाल्यास साखरेचे दर किमान ५०० रु प्रति क्विंटल ने वाढतील व शिल्ल्क् साखर साठा विचारात घेतल्यास ८५०० कोटी रुपयांचे फायदा देशातील साखर कारखान्यांना होईल तर साखर १०% निर्याती मुळे अंदाजे १५०० कोटी रुपयांचा फटका बसेल व साखर निर्याती करीता केंद्र सरकार ने १५०० कोटी रुपयांचे अनुदान त्वरीत ऊस उत्पदकांच्या खात्यावर वर्ग़ करण्यात यावे व साखर निर्याती बाबत कारखान्यांना पाठपुरावा करण्यात यावा. येत्या गाळाप हंगामात देशात विक्रमी साखर उत्पादन अपेक्षित असल्याने अतिरिक्त साखरेचा बफर साठा केंद्र सरकार ने करावा व त्या वरील व्यास साखर कारखान्यांना देण्यात यावे जेणे करुन साखरेचा बाजारातील पुरवठा संतुलित राहील. या बाबत मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी , अन्न पुरवठा मंत्री श्री रामबिलास पासवान व वाणिज्य मंत्री श्री सुरेश प्रभु यांना निविदेन देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.  


0 comment