स्वाभिमानी विचार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत मुखपत्र ..

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा काही अंशी दिलासा ३४८४ कोटींची मदत जाहीर.

Published 9 months ago by Admin

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा काही अंशी दिलासा ३४८४ कोटींची मदत जाहीर.

मराठवाड्यात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने हजारो हेक्टरमधील कपाशी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते बोंड अळीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. खरीप हंगामात बोंडअळी आणि तुडतुडे रोग प्रभावीत पिकांच्या शेतक-यांना शासनाने मदत देण्याबाबातचा शासन निर्णय जारी केला असून यानुसार ३ हजार ४८४ कोटी रुपये रक्कम शेतक-यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. ३ समान हप्त्यात ही मदत शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली . बोगस व निकृष्ट दर्जाच्या बियाणे विक्री विषयी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राञी १ वाजता बदनापुर पोलीस स्टेशन मध्ये तालुका अध्यक्ष अशोक मुटकुळे यांनी तक्रार दाखल केली व देशातील पहिला गुन्हा महिको व मोसेन्टो कंपनी वर दाखल करण्यात आला आहे . बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसानी संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य सरकार कडे पाठपुरावा सुरु होता.

 

खासदार राजुशेट्टी यांनी मा. मुख्यामंत्र्यांना या विषयी त्वरीत हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. प्रति हेक्टर १२,००० रु प्रमाणे एन डी आर एफ मार्फत मदत जाहीर करण्यात आली मात्र पिक विमा कंपन्यांनी मदत देण्यापासुन पोबारा केला आहे. राज्य सरकारने या पिक विमा कंपन्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटने तर्फे करण्यात येत आहे. मदतीच्या रकमा ऐन खरीपाच्या तोंडावर शेतकर्यांना मिळायला लागल्याने काही अंशी शेतकर्यांना दिलासा मिळत असल्याचे श्री माणिक कदम मराठवाडा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी सांगितले. सरकारने पिक विमा कंपन्यांच्या विरुद्ध मोहीम उघडावी व त्यांच्या कडुन नुकसान भरपाई शेतकर्यांना मिळवुन द्यावी अशी मागणी श्री गजाजन बंगाळे पाटील कार्यध्यक्ष मराठवाडा यांनी केली. १२०० कोटी रुपये शेतकर्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात आलेले आहेत व याचे आम्ही स्वागत करतो असे स्वाभिमानी प्रव्क्ते योगेश पांडे यांनी सांगितले. हेक्टरी किमान २५,००० रुपये नुकसान भरपाई शेतकर्यांना मिळालीच पाहीजे असे त्यांनी सांगितले. शेतकरी सन्मान अभियानाच्या लढ्याचे हे फलित असल्याचे खा श्री राजु शेट्टी यांनी सांगितले. बोंडअळी मुळे झालेल्या नुकसान भरपाई बद्द्ल प्रथमच अशी मदत मिळत आहे. शेतकर्यांना लुबाडणार्या सर्वच विमा कंपन्यांना धडा शिकविण्याची मागणी त्यांनी मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे केल्याची माहीती ॲड योगेश पांडे यांनी दिली.

 

१७६७९५३ हेक्टर -   २६९०९३९ शेतकरी    -    १२२१ कोटी रुपये


0 comment