स्वाभिमानी विचार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत मुखपत्र ..

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

पिक विमा योजना नावखाली सामुहिक लुट..

Published 9 months ago by Admin

पिक विमा योजना नावखाली सामुहिक लुट..

प्रधानमंत्री फसल विमा योजना या मोदीसरकारच्या योजने अंतर्गत देशात वर्ष २०१७/१८ मधे राज्य व केंद्र सरकार ने शेतकर्यांना पिकाच्या विमा ह्फत्या पोटी १७,७९६ कोटी रुपये अनुदान स्वरुपात भरले तर शेतकर्यांनी त्यांच्या हिस्सा ४३८३ कोटी रुपये भरले एकुण २२,१८० कोटी रुपये रक्कम विमा कंपन्यांनी विम्या पोटी जमा केली मात्र प्राप्त आकडेवारी नुसार १२,९४९ कोटी रुपयांचे देशात पिक नुकसान भरपाई पोटी वाटप झाले. मागील २०१६/१७ वर्षी देखील जवळपास २१,००० कोटी रुपये विमा हफ्त्या पोटी विमा कंपन्यांनी जमा केले मात्र ७,००० कोटी रुपयांचे नुकसान भरपाई पोटी वाटप केले. वास्तविक पहाता गत दोन्ही वर्षात देशातील शेतकर्यांना हवामानाच्या लहरीपणा व किड संकटास तोंड द्यावे लागले , लाखो हेक्टर पिक पुर्ण उधव्स्त झाले मात्र अनेक शेतकर्यांना दोन रुपये विमा नुकसान भरपाई पोटी देण्याचा पराक्रम या विमा कंपन्यांनी केला मात्र सर्वात मोठे दुर्दैव की या बाबत कोणीही देशाच्या संसदे मधे सरकारला धारेवर पकडले नाही. विरोधी पक्षांची ही जबाबदारी होती की या बाबत सरकारला जाब विचारायला पाहिजे होता मात्र खा श्री राजु शेट्टी वगळता या बाबत कोणीही साधे बोलण्यास देखील तयार नाही.

सरकारने १८,००० कोटी रुपयांचे अनुदान विम्या पोटी देऊन जणु आपली जबाबदारी पुर्ण झाल्याच्या थाटात जाहीरातबाजी सुरु केली मात्र प्रत्यक्ष याचा लाभ शेतकर्यांना पोहोचला की नाही या बाबत सोयीस्कर रित्या मौन बाळगले. पिक विमा क्षेत्रात पुर्वी केवळ सरकारी संस्था होत्या मात्र खाजगीकरणाच्या कौतुका स्वरुप या क्षेत्रात खाजगी कंपन्यांना परवांनगी दिली गेली अर्थात खाजगी कंपन्या या काही समाजसेवा करण्यास काम करत नाही तर नफा कमाविणे हा एकमेव त्यांचा हेतु असतो मग करोडो शेतकर्यांशी संबधीत असलेल्या पीक विमा बाबत न्यायाची अपेक्षा करणे मुर्खपणाच समजावा. मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी जिल्ह्या मधे रिलायंस जनरल इंशुरन्स द्वारे शेती नसलेल्या व्यक्तीच्या नावाने पिक विमा देत त्याला चांगले पिक आल्याचा पंचनामा करत तोच निष्क़र्ष् इतरांना लावत लाखो शेतकर्यांना पिक विमा नुकसान क्लेम पासुन वंचीत केल्याची तक्रार खा श्री राजु शेट्टी यांनी केली होती. नुकतेच राज्याच्या खरीप पिक विमा बाबत परीपत्रक काढण्यात आले असता त्यांत रिलायंस कंपनीचे नाव वगळलेले दिसले.

स्वाभिमानीचे मराठवाडा अध्यक्ष श्री माणिक कदम व कार्याध्य्क्ष श्री गजानन बंगाळे पाटील यांनी पिक विमा योजने मधील घोटाळे बाबत वारंवार पाठपुरावा सुरु ठेवल्याने माध्यमांनी गत काही दिवसांपासुन याची दखल घेतली. तीन महिन्या पुर्वी बोंडअळी ग्रस्त शेतकर्यांना विमा नुकसान भरपाई मिळत नसल्याने या बाबत माहीती घेण्यास सुरुवात केली असता सगळा प्रकार समोर आला.

खरे तर शेतकर्यांनी विमा मिळत नसल्याने तक्रारी करणे जरुरी असतांना केवळ मोर्चे व आंदोलन करुन प्रश्न मार्गी लागणार नाही तर हा लढा कागदावर देखील केला पाहीजे व लेखी तक्रारीं सरकार व न्याय व्यव्स्थे कडे करणे जरुरी आहे. गत दहा वर्षात किती रक्कम पिक विम्या करता कंपन्यांनी प्रिमियम पोटी वसुल केली व किती रक्कम नुकसान भरपाई पोटी दिली याची आकडेवारी माहीती कायदा अंतर्गत मागुच मात्र शेतकर्यांनी जागरुक रहात या विषयी लेखी तक्रारी शासनाकडे केल्या पाहीजे व त्याची प्रत आम्हाला दिल्यास नक्कीच त्याचा पाठपुरावा करीत रक्कम वसुल केली जाईल,


0 comment