स्वाभिमानी विचार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत मुखपत्र ..

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

शेतकर्यांच्या प्रश्नावर त्वरीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा - राष्ट्रपतींना खा.राजु शेट्टी यांनी केली विनंती.

Published 9 months ago by Admin

शेतकर्यांच्या प्रश्नावर त्वरीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा - राष्ट्रपतींना खा.राजु शेट्टी यांनी केली विनंती.

नवी दिल्ली : देशातील शेतकर्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे , उत्पादन खर्च निघत नसल्याने दिवसोंदिवस शेतकरी कर्जाच्या दरीत लोटला जात असल्याने देशात शेतकरी आत्मह्त्येचे सत्र सुरु आहे. देशातील शेतकर्यांच्या समस्येवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे या करीता देशभरातील  करोडे शेतकर्यांनी १० मे रोजी आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकर्यांना निवेदन दिले तसेच १ मे रोजी देशातील हजारो ग्रामपंचायतींनी संसदेचे शेतकरी प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवावे असा ग्रामसभेचा ठराव देखील मा.राष्ट्रपती यांना पाठविले. आज सकाळी मा.खा श्री राजु शेट्टी यांनी अखिल भारतीय किसान समन्यव्यक कॅार्डेनिशन कमेटीच्या वतीने राष्ट्रपती महोदयांची भेट घेत शेतकर्यांच्या समस्येवर त्वरीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची त्यांना विनंती केली. कोणाच्या ह्ट्टाला पुर्ण करण्या करीता जी.एस.टी बील पारीत करण्यासाठी मध्यरात्री संसदेचे सर्व सदस्यांना उपस्थित होता येते तर मग शेतकर्यांच्या प्रश्नावर देशातील लोकसभेचे व राज्यसभेचे सर्व खासदार एकत्र का येत नाही असा सवाल त्यांनी मा.राष्ट्रपती महोदयांकडे उपस्थित केला. देशाच्या स्वातंत्र्या नंतर प्रथमच देशातील शेतकरी त्यांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करत आहे व मा.राष्ट्रपती महोद्यांनी त्यांच्या विशेष अधिकारात केंद्र सरकारला शेतकरी समस्येवर चर्चा करण्यासाठी त्वरीत अधिवेशन बोलविण्यास आदेशित करण्याची श्री राजु शेट्टी यांनी मागणी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रव्क्ते ॲड् योगेश पांडे यांनी ही माहिती दिली.


0 comment